श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित “एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत”, “एस.एन.पी.टी. टॉक” सिरीज 4 “अंतर्गत क्लिनिकल रिसर्चवरील करिअर संधीं वर विशेष व्याख्यान”

0

नाशिक : श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित “एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत”, “एस.एन.पी.टी. टॉक” सिरीज 4 “अंतर्गत क्लिनिकल रिसर्चवरील करिअर संधीं वर विशेष व्याख्यान” आयोजन करण्यात आले,
श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित “एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत “एस.एन.पी.टी. टॉक” ” सिरीज 4 ज्यामध्ये ‘क्लिनिकल रिसर्च – आशादायी करिअर संधी’ या विषयावर व्याख्यान 11 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री राहुल जैन (MS Precision Oncology, MBA HAHM, PGDQA) आणि श्री राहुल सपाटे (PGD in Clinical Research, Quality Manager) यांनी सहभाग घेतला. श्री राहुल जैन त्यांनी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना क्लिनिकल रिसर्च व क्लिनिकल ट्रायलचे प्राथमिक स्वरूप, त्यातील संधी, आणि या क्षेत्रात विदेशी विद्यापीठांमधून फेलोशिप कशा मिळवाव्यात, याविषयी माहिती दिली. त्यांनी विशेषतः UK, US आणि अन्य आघाडीच्या देशांमधील शिक्षण संधी, तसेच जगातील टॉप १० विद्यापीठांमध्ये अर्ज कसा करावा, याबद्दलही मार्गदर्शन केले. श्री. राहुल सपाटे, जे Post Graduate Diploma in Clinical Research पूर्ण करून सध्या Quality Manager म्हणून कार्यरत आहेत, यांनी विद्यार्थ्यांना एक औषध रेणू (drug molecule) कसा विकसित केला जातो, त्याच्या गुणवत्तेची तपासणी कशी केली जाते, याबद्दल अतिशय सोप्या व समजण्याजोग्या भाषेत माहिती दिली.त्यांनी असेही सांगितले की, क्लिनिकल रिसर्चमध्ये विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत आणि या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संशोधन पेपर बारकाईने वाचणे हे पहिले पाऊल आहे. या दोन्ही वक्त्यांनी विद्यार्थ्यांना रिसर्च क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले स्किल्स, जागतिक स्पर्धा आणि इंडस्ट्रीतील गरजांबाबत अमूल्य माहिती दिली. कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यार्थ्यांनी वक्त्यांशी थेट संवाद साधून आपले प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाल्याची माहिती प्राचार्य. डॉ. विशाल गुलेचा यांनी दिली. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्रभाई ठक्कर व उपाध्यक्ष मा. श्री. प्रकाशभाई पटेल, सचिव मा. श्री. देवेंद्र पटेल, फार्मसी विभागाचे सचिव मा. श्री. उपेंद्रभाई दिनानी, उपसचिव मा. श्री. अभयभाई चोकसी व इतर पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here