Home Breaking News ओपन लाईन व रेल्वे वर्कशॉपमधील माळी समाज रेल्वे कर्मचारी यांच्या वतीने सत्यशोधक...

ओपन लाईन व रेल्वे वर्कशॉपमधील माळी समाज रेल्वे कर्मचारी यांच्या वतीने सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांची १९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0

मनमाड:-ओपन लाईन व रेल्वे वर्कशॉपमधील माळी समाज रेल्वे कर्मचारी यांच्या वतीने सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांची १९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती दिनी सी अॅण्ड डब्ल्यु व ईटीएल लोको सायडिंग मनमाड या ठिकाणी साजरी करण्यात आली.आयु.अंबादास निकम यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रा.अलका नांगरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी नेशनल रेल्वे मजदूर संघ ओपन लाईन शाखा, सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ ओपन लाईन शाखा, ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओपन लाईन शाखा व ऑल इंडिया ओ बी सी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओपन लाईन शाखा यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उमेश खैरनार यांनी केले तर आभारप्रदर्शन अंबादास निकम यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन संदिप सोनवणे, ज्ञानेश्वर म्हैसे, योगेश वाघ, महेंद्र शिंदे, सोनाली आहेर, संभाजी धनवटे,अक्षय जेजुरकर,,चंद्रकात खैरे,रवि सुरसे, उमेश खैरनार, मनोज गाजरे, विजय काळे, योगेश वोढेरे, ईश्वर पाटील, स्नेहल सोनवणे,बाळू जाधव, गणेश वाघ पंकज मोकळ आदि ने केले.यावेळी ,रोहित भालेराव यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,यावेळी ओपन लाईन चे कर्मचारी व महिला कर्मचारी वर्ग व अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here