श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित “एस. एन. पी. टी. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसीत”, “एस.एन.पी.टी. टॉक” सिरीज 5 Edwise International” तर्फे परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन सेमिनार

0

नाशिक, दि. ११ एप्रिल 2025 – श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या एस.एन.पी.टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे “Edwise International” या भारतातील अग्रगण्य परदेशी शिक्षण सल्लागार संस्थेच्या वतीने एक मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित करण्यात आला. या सेमिनारचा विषय होता – परदेशात पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मार्गदर्शन व प्रवेश परीक्षांची तयारी (IELTS, TOEFL, GRE, PTE इत्यादी). या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून मिसेस डिग्ना भानुशाली यांनी मार्गदर्शन केले. त्या Edwise International नाशिक शाखेच्या व्यवस्थापक असून यूके, ऑस्ट्रेलिया व आयर्लंड या देशांसाठी शिक्षण सल्लागार आहेत. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण PGDM (मार्केटिंग) हे NIIMS, मुंबई येथून झाले आहे. सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना परदेशातील शैक्षणिक संधी, प्रवेश प्रक्रिया, आवश्यक पात्रता परीक्षा तसेच विविध देशांतील अभ्यासक्रमांची माहिती दिली गेली. Edwise International ही संस्था १९९१ पासून भारतातील आघाडीची परदेश शिक्षण सल्लागार संस्था असून जागतिक शैक्षणिक संधींवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. परदेशी शिक्षणाच्या दृष्टीने Edwise ही “वन स्टॉप सोल्यूशन” असल्याचे यावेळी सांगण्यात आले.विद्यार्थ्यांनी या सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांच्या शंकांचे समाधानही करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाल्याची माहिती प्राचार्य. डॉ. विशाल गुलेचा यांनी दिली. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्रभाई ठक्कर व उपाध्यक्ष मा. श्री. प्रकाशभाई पटेल, सचिव मा. श्री. देवेंद्र पटेल, फार्मसी विभागाचे सचिव मा. श्री. उपेंद्रभाई दिनानी, उपसचिव मा. श्री. अभयभाई चोकसी व इतर पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here