अक्षरा सामजिक प्रतिष्ठानचे महाराष्ट्रातील ५५ वे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर यशस्वीरीत्या संपन्न.

0

मुंबई (भोईवाडा-प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)

अक्षरा सामजिक प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवून यशस्वितेची उंची गाठली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेचे सल्लागार दिवंगत श्री .प्रदीप तु.मोहिते यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रातील ५५ वे मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर सोमवार दि.२४ /०३/२०२५ संस्थेचे मुंबई जिल्हा कार्यालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वसाहत (भोईवाडा बेस्ट कामगार वसाहत) जेरबाई वाडिया रोड परेल, भोईवाडा मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मोफत मधुमेह, रक्तदाब, इलेक्ट्रिक कार्डिओग्राम (ECG) तपासणीसह विविध आजारावर आयुर्वेदिक उपचार पद्धती मार्गदर्शन करण्यात आले. ह्या शिबिरास मुंबईच्या मा. महापौर सौ. श्रद्धा जाधव, मा. नगरसेवक श्री.सुनील मोरे, शिव आरोग्य सेना महाराष्ट्र सरचिटणीस श्री. जितेंद्र दगडू दादा सकपाळ, शिवडी विभागातील समाजसेविका सौ.रिया बावकर, सौ.योगिता काटे (वॉर्ड महिला वॉर्ड अध्यक्षा भाजप) उद्योजक श्री. रूपेश तरल, शिवसेना (शिंदे गट) चे युवा नेते निलेश राणे,सौ.वसुधा वाळुंज, सौ.सुवर्णा सावंत, सौ.पूजा बोटवाला युनिकेअर हेल्थ सेंटरचे श्री.रमेश कांबळे, आंबेडकरी चळवळीत ज्येष्ठ कार्यकर्ते चिंतामण खरे, बौद्धजन पंचायत समिती शिवडी विभाग गट क्रमांक १३ चे कार्याध्यक्ष संतोष दामाजी जाधव, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३७२ चे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, शिवप्रसाद गृहनिर्माण संस्थेचे श्री कमलनाथ केरकर, हरिश्चंद्र पांचाळ, आगरी समाज विकास संघाचे कोषाध्यक्ष श्री अनिल तांडेल, रेशनिंग कृती समिती चे संदीप सुमन, राकेश सकपाळ श्रीमती.योगिनी राऊत ताई (मनसे उप शाखा अध्यक्ष) शिव आरोग्य सेना शिवडी श्री.अनंत कोटकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या उपक्रमास अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान मुंबई जिल्हा अध्यक्ष मान.संदिप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली कु .सिद्धांत मोहिते, कु. प्रणित वीर, कु. सौरभ मोहिते, संकेत जाधव, कु.सम्यक मोहिते,प्रज्वल सकपाळ,स्नेहल मोहिते, भक्ती तांडेल,सोनल कांबळे, रेश्मा सकपाळ, मीनल असगोलकर, युनिकेअर हेल्थ सेंटर, आचरेकर डेकोरेटर्सचे प्रोप्रा.दिनेश आचरेकर ह्यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ह्या आरोग्य शिबिरास स्थानिक मान्यवरांनी, स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली ह्या सर्वांचे आणि संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यानी शिबिर यशस्वी केल्याबद्दल अक्षरा सामजिक प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमोल वंजारे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here