मनमाड : दि. १४/०१/२०२५ रोजी मकर संक्रात सणाचे अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पंतग उत्सव होत असतो. त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणात नॉयलॉन मांज्याची विक्री होत असते. नॉयलॉन मांज्यामुळे मानवी जिवीतास तसेच पशु पक्षी यांचे जिवीतास धोका निर्माण होत असतो.मा. पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक, मालेगांव व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड उपविभाग यांनी दिलेल्या सुचना नुसार मनमाड शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन छापा पथक तयार करुन मनमाड शहरातील एकुण १० पंतग व दोरा विक्री करणाऱ्या दुकानाची अचानक तपासणी केली परंतु सदर स्टोअर्समध्ये कोणत्याही प्रकारचा नॉयलॉन मांज्या मिळुन आलेला नाही. तसेच त्यांना नॉयलॉन मांज्या विक्री करण्यास मनाई असल्याचे सांगुन नॉयलॉन मांज्या विक्री केल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येईल बाबत सांगितले आहे.मनमाड शहरातील सर्व सुज्ञ नागरीकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, मनमाड शहरात व परिसरात कोणत्याही स्टोअर्समध्ये नॉयलॉन मांज्या विक्री होत असल्यास बाबत माहीती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधुन माहीती द्यावी. माहीती देणाऱ्या व्यक्तीचे नांव गुप्त ठेवण्यात येईल, बाबत आवाहन करण्यात येत आहे.








