Home Breaking News भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्याचे उल्लंघन केले म्हणून पाथर्डीतील ओबीसींच्या रास्तारोको केलेल्या...

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्याचे उल्लंघन केले म्हणून पाथर्डीतील ओबीसींच्या रास्तारोको केलेल्या आंदोलक नेत्यावर गुन्हे दाखल

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्यावर आणि त्यांच्या ओबीसी समाजावर राजकीय द्वेषापोटी जाहीरपणे आक्षेपार्ह टीका टिप्पणी करीत असल्यामुळे संपूर्ण राज्यभर जातिय तेढ निर्माण करुन सामाजिक एकतेचा भंग करीत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाजाच्या वतीने पाथर्डीचे तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलिस निरीक्षक यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घ्यावा म्हणून सकल ओबीसी समाज पाथर्डी यांनी दिनांक 8/1/2025 रोजी सकाळी दहा वाजता पाथर्डी येथील नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्या बाबद 6/1/2025 रोजी पाथर्डी पोलिस स्टेशनला निवेदन पत्र दिले होते. त्या अनुषंगाने पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी ओबीसी समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन त्यांना रास्तारोको आंदोलन करण्यापासून परावृत्त होणेकामी आवाहन केले होते. आणि उलट टपाली ओबीसी समाजाच्या काही निवडक कार्यकर्त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 168 नुसार तात्काळ नोटीसा ही बजावण्यात आल्या होत्या. तरी देखील वरील मागणीसाठी आज दिनांक 8/1/2025 रोजी सकाळी अकरा ते आकरा वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान पाथर्डी शहरातील वसंतराव नाईक चौकात 1) संभाजी किसन पालवे(कोल्हार),2) गोकुळ दौंड( सोनोशी),3) संजय बडे(येळी),4) भगवान आव्हाड(जांभळी) 5) महादेव दहिफळे(मोहटे)6) संदिप गर्जे (निपाणी जळगाव),7) दिलिप खेडकर (भालगाव),आणि त्यांचे सर्व सहकारी अशा 25 ते 30 लोकांनी एकत्रितपणे जमुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना रोखुन धरून प्रवाशांची गैरसोय केली म्हणून वरिल व्यक्ती त्यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 32/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 126(2),189(2),191(2), प्रमाणे कायदेशीर फिर्याद पोलिस काॅंन्स्टेबल नागेश वाघ यांनी दाखल केली आहे. पुढील तपास पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब हे करीत आहेत. एकंदरीत मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष संपूर्ण राज्यभर पेटला आहे त्यामुळे गुन्हे प्रती गुन्हे,दावे प्रती दावे अनेक ठिकाणी दाखल करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासन नेमकी काय भूमिका घेतय ते आगामी काळात दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here