नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील विधानपरिषद निवडणूकीत पानसरेंना वाढता पाठिंबा!

0

अहमदनगर (सुनिल नजन/ चिफब्युरो/अहमदनगर जिल्हा) नाशिक विभागातील विधानपरिषदेच्या निवडणूकीतील शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवार छगन पानसरेंना विविध संघटनांचा वाढता पाठिंबा! नाशिक विभागातील विधानपरिषदेचे शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवार छगनराव पानसरे यांना विविध संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. न्यु राष्ट्रीय समाज पार्टी, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ,शिक्षक प्रशिक्षक संघ महाराष्ट्र राज्य, हिंदुस्थान जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, आणि खेळाच्या विविध संघटना यांनी पानसरे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. तरी नाशिक विभागाती सर्व शिक्षकांनी पानसरे सर यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करावे असे आवाहन वरील संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here