शाळेला मदत करताना मी केव्हाही हात आखडता घेत नाही: आमदार सुहास कांदे

0

नांदगाव :शाळांची इमारत मंदिरच समजले पाहिजे. कारण या ठिकाणी कुठल्याही जातीपातीचा,धर्माचा विद्यार्थी निसंकोचपणे शिक्षण घेऊ शकतो.म्हणून शाळेला मदत करताना मी केव्हाही हात आखडता घेत नाही. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव व जळगाव बुद्रुक येथील नूतन इमारतीचा उदघाट्न सोहळा आमदार सुहास कांदे यांचे हस्ते आज पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
. ते पुढे म्हणाले की, शिक्षण हे खरोखरचं वाघिणीचे दूध आहे. ते पिल्यानंतर माणूस जसा गुरगूर करायला लागतो तसा तो समाजाच्या हक्कासाठी ही भांडायला लागतो. मी वेहळगाव च्या शाळेला दहा ते बारा संगणक दिलेत. तर जळगाव बुद्रुकच्या शाळेच्या इमारतीसाठी एक लाख रुपयांचा निधी दिला आहे. तसेच या शाळेने मागणी केल्यास त्यांनाही दहा ते बारा संगणक घेऊन देईन. या ठिकाणी ज्युनियर कॉलेज व सिनियर कॉलेज ची मागणी आहे. तरी मी शिक्षण मंत्री महोदय यांच्याकडून ही मागणी पूर्ण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करेन. आज उदघाट्न झालेल्या या शाळेच्या आवारात पूर्ण पेव्हर ब्लॉक व शाळेला संपूर्ण संरक्षक भिंत जिल्हा नियोजन च्या निधीतून बांधून देईन. असे ही आमदार श्री. कांदे शेवटी म्हणाले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, उपाध्यक्ष अँड. पी. आर. गिते,सहचिटणीस अँड. तानाजी जायभावे, विश्वस्त दिगंबर गिते, दामोधर मानकर, सुभाष कराड, बाळासाहेब वाघ, विलास आव्हाड, सुरेश घुगे, सुधाकर कराड, अशोक भाबड, उत्तम बोडके, श्याम बोडके, तुळशीदास विंचू, अँड. जयंत सानप,जगन्नाथ धात्रक, विष्णू नागरे, विठोबा फड, अशोक नागरे, रामनाथ बोडके,दौलत बोडके, भगवंत चकोर, विजय सानप, विजय बुरकूल, निलेश इप्पर, मोहन चकोर, राजेंद्र सांगळे, प्रमोद भाबड, अंकुश कातकडे,किशोर लहाने, आदीसह वेहेळगाव व जळगाव बुद्रुक मधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here