अनुसूचित जातीतील सुरक्षारक्षक नेमावा : आयु. महेंद्र पगारे

0

येवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमी स्मारक येवला येथे अनुसूचित जाती प्रवर्गातील रिक्त सुरक्षा रक्षक जागेवर मा .ना. भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे व श्री दिलीप खैरे त्यांच्या राजकीय दबावाने गैर मार्गाने दुसऱ्या प्रवर्गातील नेमणूक केलेल्या श्री सागर राहुळ यांना नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे निरीक्षक श्री विशाल जोगी यांनी हटविल्याने दिनांक 18/6/2024 रोजी एक दिवसीय लक्षवेधी उपोषण करण्यात आले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमी स्मारक येवला येथे मी दि.6/2/2024 रोजी अनुसूचित जातीच्या रिक्त झालेल्या जागेवर वेगळ्या प्रवर्गाचा सुरक्षारक्षक श्री सागर राऊळ नेमला असून याला येथून हटवा व अनुसूचित जातीतील सुरक्षारक्षक नेमावा या मागणी साठी चार दिवस महिंद्र पगारे यांनी  आमरण उपोषण केले,त्यांना राज्यातून  पाठिंबाचा पडसाद पाहता दि.9/1/2024 रोजी श्री विशाल जोगी सुरक्षा रक्षक मंडळाचे निरीक्षक यांनी उपोषणाच्या ठिकाणी तत्काळ भेट देऊन  उपोषणाच्या मागण्या मान्य करून जमलेल्या सर्व अन्यायी यांच्या समावेत सदरचा इतर प्रवर्गाचा भरलेला सुरक्षा रक्षक याला हटवून अनुसूचित जातीचा सुरक्षारक्षक भरण्याचे महेंद्र पगारे यांना  लेखी आश्वासन दिले होते, तसेच उपोषण सोडविले व तशा बातम्या वर्तमानपत्रे व मीडियातून प्रसिद्ध झाल्या त्यानंतर श्री जोगी यांनी लेखी पत्र देऊनही चार महिने झाले तरी कोणतीही कार्यवाही केली नाही.जो सुरक्षा रक्षक अचानक नेमला गेला तो मंडळाच्या प्रतीक्षा यादीत नव्हता तो वेगळ्या प्रवर्गाचा असून त्याला श्री विशाल जोगी यांनी गैर पद्धतीने घेऊन प्रशासनाची व आंबेडकरी जनतेची त्यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून फसवणूक केली आहे,सर्व समाजापुढे लेखी आश्वासन देऊन उपोषण परावृत्त करण्याचे म्हणून एक जबाबदार निरीक्षकाचे शासनाच्या कामात चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या प्रवर्गातील सुरक्षारक्षक गैर पद्धतीने नेमून महेंद्र पगारे उपोषणाची  व समाज प्रति न्याया च्या भावनांची थट्टा केली आहे,आणि उपोषणाची  फसवणूक केली आहे.या सर्व प्रकरणात मा .ना. भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे व श्री दिलीप खैरे यांनी सदर श्री सागर राऊत या व्यक्तीस मुक्ती भूमी येथे सुरक्षारक्षक पदावर मा.ना. भुजबळ साहेबांच्या पश्चात राजकीय हस्तक्षेपाने दबावाने भरती केला आहे यामध्ये यांनी नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदीत असलेल्या पुणे भारती येथील स्थापना मधील काही सक्षम अधिकारी यांना श्री सागर राऊळ यांच्यावर कार्यवाही करू नये यासाठी विशेष प्रयत्न केले. या उलट स्वतःच्या राजकीय चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप केलेल्या कामाचे खापर मात्र मुक्ती भूमी येथील पर्यवेक्षक श्री सिद्धार्थ गिरे यांच्यावर फोडून व त्यांचे तडकाफडकी राजकीय दबावाने संबंधित विभागास राजकीय दबावाने बदली करण्यात सांगितली हा यांच्यावर अतिशय क्रूर पद्धतीने सूड उगवण्याच्या भावनेने केलेल्या अन्यायात आहे,यासाठी विकृत राजकारणी लोकांच्या या अशा चुकीच्या हस्तक्षेपामुळे व राजकीय दबावामुळे आम्हाला आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दी.13 ऑक्टबर 1935 खाली केलेल्या धर्मांतर घोषणा ऐतिहासिक स्थळ असलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमी स्मारकाची काळजी वाटत आहे, मुक्ती भूमी स्मारक येथील वेगळ्या प्रवर्गातील गैर पद्धतीने व मा.ना. भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री बाळासाहेब लोखंडे व श्री दिलीप खैरे यांच्या राजकीय दबावाने व हस्तक्षेपाने आलेला सुरक्षा रक्षक श्री सागर राऊळ हा तत्काळ हटवावा व सरकारी कामात राजकीय हस्तक्षेपाला बळी पडणाऱ्या व चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या मंडळातील विकृत व चुकीच्या मानसिकतेचा निरीक्षक श्री विशाल जोगी यांना देखील निलंबित करून पद मुक्त करणे याकरिता महेंद्र पगारे व त्यांचे सहकारी यांनी सामाजिक न्यायच्या भूमिकेसाठी मंगळवार दि.28/6/2024 रोजी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विंचूर चौफुली येथील पुतळा समोरील मोकळ्या जागेत एक दिवसीय लक्षवेधी उपोषण करण्यास बसले होते,या वेळी आयु. महेंद्र गौतम पगारे स्वरीप तालुकाध्यक्ष तथा चेअरमनजेष्ठ नेते माणिकभाऊ शिंदे जेष्ठ नेते अंबादास अन्ना बनकर युवा नेते संभाजीराजे पवार नगरसेवक अमजद शेख युवा नेते सचिन आहेर महेशअण्णा काळे मनमाड स्वारीपचे नगरसेवक संजय भालेराव सेनेचे पाडुरंग शेळके अजीजभाई शेख आर पी आय आठवले गटाचे वंदेश गांगुर्डे,विजय घोडेराव बाळासाहेब आहिरे, सुभाष गांगुर्डे सुरेश खळे विनोद त्रिभुवन मयुर सोनवणे,महेंद्र खळे,विजय पगारे,बाळासाहेब सोनवणे,अतुल धिवर,वसंत घोडेराव,पोपटराव धिवर,गौतम पगारे, विकास वाव्हुळ,मानेकर बाबुजी,कैलास पगारे,सुरेश सोनवणे,प्रशांत वाघ,दादाभाई शेख,नाना पिंपळे,सोमनाथ मोरे,कृष्णा मोरे, समाधान गुंजाळ, दादा खळे,अँड.अनिल झाल्टे, अमोल माळी, शिवाजी मोरे,चांगदेव गाडे,मनोहर पवार,बाळु आहिरे,कुणाल लाठे,मिलिंद गांगुर्डे,अविनाश बोरगे,नाना ठोबरे,रोहीत पवार, शुभम रानडे, अदित्य पगारे,अनिकेत जगताप,महीला आघाडीच्या आशाताई आहेर,नयनाताई सोनवणे,ज्योती पगारे, सविता पवार,उषा पगारे,उषा गायकवाड,सिंधुबाई धिवर, रेश्माताई आहीरे,वैशाली मावस,रंजना चव्हाण,सुमनबाई पवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, संबंधित अधिकाऱ्याने  लवकरात लवकर दखल न घेतल्यास यापुढे तीव्र प्रकारचे आंदोलनात करण्यात येईल असे माननीय महेंद्र पगारे यांनी सांगितले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here