प्रत्येक दिवस एक नवी संधी घेऊन उगवतो.फक्त आपल्याला त्या संधीचे सोने करता आले पाहिजे : समाजसेविका सौ. अंजुम सुहास कांदे

0

नांदगाव : शिकण्याची कुठलीही वेळ नसते, कारण प्रत्येक दिवस एक नवी संधी घेऊन उगवतो.फक्त आपल्याला त्या संधीचे सोने करता आले पाहिजे. असे प्रतिपादन समाजसेविका सौ. अंजुम सुहास कांदे यांनी केले. शहरातील ओसवाल भुवन येथे सप्तरंगी सखी मंच च्या वतीने आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.सौ. कांदे पुढे म्हणाल्या की, ज्या प्रमाणे तुम्ही महिलांनी या ठिकाणी मेळावा घेऊन विविध वस्तूंचे स्टॉल लावून खाद्यपदार्थासह, वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवून छान संकल्पना राबवली ती निश्चितच कौतुकास्पद आहे. म्हणजेच आवड असली की, सवड मिळते. आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आपले कुटुंबंप्रमुख आमदार अण्णासाहेबांनी मतदार संघातील महिलांसाठी भव्य दिव्य उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली आहे. येत्या एक ते दीड महिन्यात गरजवंत, इच्छुक महिलांसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग सुरु होणार आहेत. तीस मिनिटापासून ते तीस दिवसांपर्यंत या प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे.पहिल्या टप्यात सुमारे वीस ते पंचवीस हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.आपण सर्व मिळून तालुक्याचे नाव उज्वल करू असे सौ.अंजुम कांदे शेवटी म्हणाल्या. यावेळी त्यांनी येथे लावलेल्या विविध स्टॉल ला भेटी देत अनेक वस्तूंची खरेदी करत या महिला, बालकांचा हुरूप वाढवला. यावेळी कंचन गुप्ता यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी च्या सौ. उज्वला खाडे, सौ. रोहिणी मोरे, आरती शर्मा, रुपाली पारख, शुक्ला नाशिककर, प्रीती सेठी, नीलिमा नाशिककर, खुशबू अग्रवाल, भारती कलंत्री, श्रुती अग्रवाल, श्वेता अग्रवाल, आदीसह शेकडो महिला, तरुणी,मुले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here