शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुक लढवन्यासाठी सौ. हर्षदाताई काकडे यांनी रणशिंग फुंकले? नवीन जनसंपर्क कार्यालयाचे शेवगावात उदघाटन संपन्न!

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा) अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आमदारकीची निवडणूक लढवन्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ हर्षदाताई काकडे यांनी रणशिंग फुंकले आहे. शेवगाव शहरातील मीरी-तिसगाव रोडवरील आंबेडकर चौकात जनशक्ती विकास आघाडीच्या नावाने नवीन कार्यालयाचे उदघाटन ताजनापूर येथील दत्त आश्रमाचे ह.भ.प. बालयोगी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष जगन्नाथ गावडे, सचिव अकबर शेख, अँडव्होकेट शिवाजीराव काकडे, सौ.हर्षदाताई काकडे, प्रुथ्वीसींह काकडे,पतसंस्थेचे चेरमन अशोकराव काळे,गंगोत्री पतसंस्थेचे चेरमन गोविंद वाणी साहेब,आबासाहेब काकडे, अशोक ढाकणे, भाउसाहेब राजळे,माणिक गर्जे,भाउसाहेब सातपुते, राजेंद्र आघाव,श्रमिक संघाचे सचिव नवनाथ खेडकर हे उपस्थित होते.यावेळी काकडे दांम्पत्याचा अनेक मांन्यवरांनी सत्कार केला.अँडव्होकेटे शिवाजीराव काकडे म्हणाले की या तालुक्यातील जनतेला आता बदल हवा आहे. नव्या नेतृत्वाची आस लागली आहे. ज्या घराण्यांना या मतदारसंघाने वारंवार संधी दिली त्या घराण्याकडून जनतेच्या पदरात काहीच पडले नाही. जनता निराश झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघाला आता बदल हवा आहे. आणि तो बदल हर्षदा काकडे च्या रुपाने स्विकारण्याची जनतेची मानसिकता झालेली आहे.असे शिवाजीराव काकडे यांनी निक्षून सांगितले. सत्काराला उत्तर देताना सौ हर्षदाताई काकडे म्हणाल्या की शेवगाव पाथर्डी तालुक्यातील ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शेवगावातील आंबेडकर चौकात या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय सतत कार्यरत राहणार आहे.शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची काय अवस्था झाली आहे ते आपण प्रत्यक्ष पाहतच आहोत.शेवगाव तालुक्यातील पाणी प्रश्न, बसस्थानक प्रश्न, शहरातील रस्त्यावरील घाण,पाथर्डी तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नाला विधानसभेत वाचा फोडण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. शेवगाव-पाथर्डी तालुक्याचा थांबलेला विकास सुरु करण्यासाठी आज मध्यवर्ती भागात हे कार्यालय कार्यरत होत आहे याचा तालुक्यातील जनतेला आनंद होत आहे.सर्व सामांन्य कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर आम्ही काम करणार आहोत असे माजी जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदाताई काकडे यांनी सांगितले.नगर जिल्ह्यात सर्व प्रथम शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here