बालगंधर्व कला अकादमी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

0

पुणे – जागतिक रंगभूमी दिनाच्या पुर्वसंधेला आयोजित दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवार्ड २०२४ ने बालगंधर्व कला अकादमी परिवार सन्मानित.”नाट्य आणि सिनेसृष्टीतील नवे पर्व, रंगभूमीलाही होई जिच्यावर गर्व, अशी एकमेव कला अकादमी बालगंधर्व” अशीच सर्वत्र ख्याती असलेल्या नामांकित अशा बालगंधर्व कला अकादमी परिवार यांना हा पुरस्कार देण्यात आला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराजराजे भोसले, समाजसेविका भुमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई, जेष्ठ अभिनेते रझा मुराद, श्री.दिपक शिर्के यांच्या हस्ते अकादमीचे मा. संचालक, किशोर कुमार यांना देण्यात आला. महाराष्ट्रातील सर्वोत्तम फिल्म ॲंड थिएटर आर्टस् अकादमी म्हणून शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय लावणी, गायन आणि नाट्याभिनयाचे सर्वोत्तम प्रशिक्षण देणारी तसेच देशातील सर्व स्तरातील कलावंतांना आपले कलागुण सादर करण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातील सर्वोच्च मानाचे आणि हक्काचे असे राष्ट्रीय व्यासपीठ आणि कलामंच उपलब्ध करुन दिल्याने सांस्कृतिक क्षेत्रातील अमुल्य योगदानासाठी हा पुरस्कार बालगंधर्व अकादमीचे संचालक, मा. किशोर कुमार यांना हा पुरस्कार देण्यात आला. रंगभूमी कलावंतासाठी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन अकादमीद्वारा दरवर्षी केल्या जाते. या पुरस्कार सोहळ्याला नाट्य सिनेसृष्टीतील अनेक कलांतांची उपस्थिती लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here