लोकसभेला ओबीसी उमेदवार देउन विधानसभा आपणच लढणार: प्रा.चव्हाण सर

0

अहमदनगर : (सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहमदनगर जिल्हा) वंचित बहुजन आघाडी ‌अहमनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ओबीसी उमेदवार देणार असून विधानसभा मात्र आपणच लढणार असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसनराव चव्हाण सर यांनी केले ते अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील ममता लाॅन येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत अध्यक्ष पदावरून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अहमदनगर जिल्ह्याचे वंचितचे महासचिव नितीन गुंजाळ, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, पाथर्डी तालुका महिला उपाध्यक्षा रोहिणी ठोंबे,रेषमा गायकवाड, अशोक बीडे हे उपस्थित होते.प्रा.किसनराव चव्हाण सर पुढे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्राच्या ४८ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची ताकद किती आहे हे सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे.संपुर्ण महाराष्ट्राचे राजकारण हे वंचित बहुजन आघाडीच्या भोवतीच फिरत आहे.कारण लोकांनी खिशातले पैसे घालून राज्यात चांगल्या प्रकारे वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची बांधणी केली आहे.समोरचा उमेदवार कोण असेल याचे आपल्याला काही देणे घेणे नाही पण येणाऱ्या काळात आपल्याला आपलाच ओबीसी उमेदवार उभा करून मतदान करायचे आहे.शेवगाव-पाथर्डी विधानसभा आपण लढणार म्हणजे लढणारच,पण आता होणारी लोकसभेची निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम आहे. या निवडणुकीत आपल्याला किती मत मिळतात यावरच विधानसभेचे गणित अवलंबून आहे. विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष हे स्वबळावरच लढतील असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला आहे.प्रस्थापितांना चपराक देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक प्रश्नांची चळवळ डोळ्यासमोर ठेवून विचार पुर्वक मतदान करावे असे त्यांनी सांगितले.पाथर्डी तालुक्यात ही प्रमुख कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक घेऊन पुढील रणणीती ठरवण्यात येणार आहे.सर्वांनी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिक पणाने काम करावे.शेवगाव तालुक्यातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी प्राध्यापक किसनराव चव्हाण सर यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची गळ घातली परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर प्रचार सभा घेण्यासाठी मला जावं लागेल म्हणून मला जिल्ह्यात अडकून न ठेवता राज्यात फिरूद्या असे प्रा.चव्हाण सर यांनी सांगितले. या बैठकीस सागर गरूड, संतोष ढाकणे, सोपान काळे, विष्णू वाघमारे, रविंद्र निळ,भिमा मोरे, सुरेश जाधव यांच्या सह शेवगाव तालुक्यातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here