मनमाड शहरातील लाड शाखीय वाणी समाजाच्या महिला दिनानिमित्त आयोजित समाज मेळाव्यात मागणी करताच ; या समाजासाठी सभामंडप व जेष्ठांसाठी पार्क मंजूरी

0

मनमाड : मनमाड शहरातील लाड शाखीय वाणी समाजाच्या महिला दिनानिमित्त आयोजित समाज मेळाव्यात मागणी करताच ; या समाजासाठी सभामंडप व जेष्ठांसाठी पार्क मंजूर केल्याची घोषणा आमदार सुहास कांदे यांच्या सुविद्य पत्नी सौ.अंजुम कांदे यांनी केली.शहरातील इंडियन हायस्कुल च्या सभागृहात लाड शाखीय वाणी समाजाने महिला दिनाचे औचित्य साधून समाज मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यास सौ.अंजुम सुहास कांदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.यावेळी समाजातील अनेक जेष्ठ समाजधुरिणांनी समाजाची पल्लवी मंगल कार्यालयाजवळ जागा उपलब्ध असून,या ठिकाणी समाजाच्या विविध धार्मिक,सामाजिक कामासाठी सभामंडप बांधून देण्याची मागणी सौ.कांदे यांच्याकडे करताच ; सौ.कांदे यांनी सदर जागेवर सभामंडप व जेष्ठांसाठी पार्क उभारून दिला जाईल.येत्या १७ तारखेपर्यंत आचारसंहिता लागली नाही.तर भूमिपूजन करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने समाजाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर लाड शाखीय वाणी समाज अध्यक्षा वैशाली देव,शिवसेना महिला आघाडीच्या सौ.उज्वला खाडे, सौ.विद्या जगताप,सौ.संगीता बागुल,सौ.रोहिणी मोरे,सौ.पूजा छाजेड, उपस्थित होत्या.याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले.तर गणेशवंदना सादर केलेल्या स्नेहा घटे या चिमूरडीचा सौ.कांदे यांनी बक्षीस देऊन गौरव केला.तर उखाणे स्पर्धेत प्रथम आलेल्या तीन स्पर्धक महिलांना ही यावेळी गौरवण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमास अण्णा साहेबांचे प्रतिनिधी शशीकांत सोनवणे, नाना येवला, श्री.शिरोडे,शारदा शिरोडे,शशी सोनावणे,सौ.मंगला प्रीतूभक्त, शकुंतला मेतकर,शोभा येवला,साधना ढासे,सौ.आशा किशोर,साक्षी अमृतकर,पुष्पा खैरनार,वंदना ब्राह्मणकर,माधवी कोठावदे,प्रीती प्रीतूभक्त,आदिंसह शेकडो महिला व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here