देशातील विविध राज्यांतून आलेल्या आदिवासी युवा-युवतींशी डॉ. भारती पवार यांचा संवाद

0

नाशिक : युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र नाशिक द्वारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ नाशिक येथे 15 वा अदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रम 20 जानेवारी ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आज झाले. या प्रसंगी भारतीय ताई पवार यांनी झारखंड, उडीसा, आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्याच्या अती दुर्गम भागातून आलेल्या आदिवासी युवा युवतींशी संवाद साधला. प्रसंगी व्यासपीठावरून संवाद साधताना खऱ्या अर्थाने युवा आदान प्रदान होणार नाही, त्यामुळे मला त्यांच्यामध्ये उतरून त्यांच्याशी त्यांच्या भाषेमध्ये संवाद साधूद्या असे म्हणत भारती पवार व्यासपीठावरून उतरून उपस्थित युवक युवतींमध्ये मिसळत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांच्या राज्यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी व त्या कशा सोडवाव्यात याबद्दल मार्गदर्शन केले.
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली व केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर जी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आखण्यात आला असून केंद्र व राज्य सरकार आदिवासींच्या विकासासाठी सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून आदिवासींच्या विकासासाठी विविध योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देत आहे असे डॉ भारती पवार यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठाचे छात्र सेवा विभाग संचालक डॉ प्रकाश देशमुख, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मोहम्मद अरिफ खान, जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here