Home Breaking News 12 डिसेंबर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती दिवस शिवसेनेतर्फे प्रेरणा...

12 डिसेंबर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती दिवस शिवसेनेतर्फे प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

0

मनमाड : आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गट नांदगाव शहर मनमाड शहर व मालेगाव येथील संपर्क कार्यालय या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती दिवस प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.मतदार संघातील विविध ठिकाणी शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.आमदार संपर्क कार्यालय मनमाड शहर नांदगाव शहर मालेगाव भालूर गटातील पानेवाडी साकोरा गटातील तळवाडे व वेहेळगाव नायडोंगरी गटातील पळाशी जातेगाव गटातील कासारी या ठिकाणी प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विविध जिल्हा परिषद गट व शहर संपर्क कार्यालय येथे झालेल्या जयंती उत्सवात स्थानिक शिवसेना युवासेना महिला आघाडी प्रतिनिधी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here