नाशिक :आज सकाळी ९ वाजता, मा. हेमंत गोडसे साहेब खासदार यांना, देशातील २६ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, ग्रॅच्युईटी लागू करून त्यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा द्या, असे निवेदन देण्यात आले.मा. खासदार महोदयांनी,मा. सचिव महिला व बालविकास विभाग भारत सरकार यांच्या सोबत, संघटना पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घडवून प्रश्न सोडविण्यासाठी मान्य केले.आजच्या शिष्टमंडळात राजेश सिंह, भगवान दवणे, पद्माताई भुजबळ, राणी मुर्तडक,पुष्पा वडजे,अन्नपूर्णा अडसुळे,ज्योती रुईकर, कविता पाटील,सरला गायखे,रंजना निकम,सविता तायडे,शामा कसोटे,लता गायकवाड, संगीता कांबळे,संगीता आहिरे,संगीता निकम,संगीता कांबळे, रेखा आल्हाड, छाया डेरिंगे,पदमा बोंबले,मीना कडाळे, प्रांजल कडवे,अलका डांगळे,सुमन गोडसे,लता पाळदे शोभा जाधव,लंका गोडसे,कल्पना कासार, अलका गोडसे,राजश्री दोंदे नगरसेवक जगदीश पाटील, वडजे भाऊ, नाशिक नागरी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी व संसारी गावातील अंगणवाडी कर्मचारी हजर होत्या.निवेदन देण्यासाठी हजर असलेल्या सर्व अंगणवाडी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदन.🙏🏻
Home Breaking News मा,हेमंत गोडसे साहेब खासदार यांना, देशातील २६ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, सर्वोच्च न्यायालयाच्या...