अहमदनगर (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार सुजय दादा विखे यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मोनिकाताई राजळे आणि जवखेडे खालसा गावच्या ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचीत लोकनियुक्त सरपंच चारुदत्त वाघ मित्र मंडळाच्या वतीने खासदार विखेपाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने काठी आणि घोंगडे भेट देउन सुबेच्छा देण्यात आल्या.आमदार राजळे यांच्या समवेत अशोक चोरमले, पुरुषोत्तम आठरे,कचरू चौथे, हे उपस्थित होते तर सरपंच चारुदत्त वाघ यांच्या समवेत सोसायटीचे माजी चेरमन नजमोद्दीन शेख, बाबासाहेब सरगड, अशोक वाघ, बाबासाहेब मतकर,मुक्तारभाई शेख, पोपट कराळे, नितीन जाधव,अॅडहोकेट वैभव राव आंधळे यांचा समावेश होता.वृद्धेश्वर साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक उद्धवराव वाघ, सुभाषराव ताठे, शेषराव कचरे यांनी ही सर्वात अगोदर सुबेच्छा दिल्या.








