अहमदनगर : (सुनिल नजन अहमदनगर जिल्हा) बहुचर्चित जवखेडे खालसा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिल्याने उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मतदानाच्या वेळी सरपंच चारुदत्त वाघ, गणेश कासार, शुभांगी कासार, अमोल वाघ, सुनिता वाघ, शांताबाई आंधळे, इरफान पठाण,वर्षा गवळी स्वप्निल वाघमारे, अमोल उर्फ गोविंद मतकर,कौसाबाई जाधव,विद्या वैभव आंधळे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.शेतकरी मंडळाचे सरपंचासह पाच सदस्य निवडून आले होते.तर स्वाभिमानी मंडळाचे सात सदस्य निवडून आल्यामुळे उपसरपंचपदी स्वाभिमानी शेतकरी मंडळाच्या उमेदवार सौ.शुभांगी संतोष कासार यांचीच उपसरपंच म्हणून निवड होईल असे चित्र असताना प्रत्यक्षात स्वाभिमानी शेतकरी मंडळाचे एक मत फुटल्याने सौ.गवळी आणि सौ.कासार यांना समसमान म्हणजे सहा सहा मते मिळाली.शेवटी लोक नियुक्त सरपंच चारुदत्त वाघ यांनी एका जादा मताचा वापर करून ते मत सौ.गवळी यांच्या पारड्यात टाकले आणि उपसरपंचपदी गवळी यांची निवड करण्यात आली.निवडनुक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसिलदार भानुदास गुंजाळ यांनी काम पाहिले.ग्रामसेवक गणगे यांनी त्यांना विशेष सहकार्य केले.नंतर सरपंच उपसरपंच यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.यावेळी व्रुद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक उद्धवराव वाघ यांनी इतरही उपस्थितांचा सन्मान केला.याप्रसंगी जेष्ठ नेते पोपटराव आंधळे, बाबासाहेब सरगड,समशुद्दीन शेख, अशोक वाघ, सुरेश वाघ, राजेंद्र कासार, सादिक शेख, राजेंद्र मतकर सर, बाबासाहेब मतकर,फारुक शेख,शेराली शेख, नामदेव वाघ, दत्तात्रय भोसले, दत्ता वाघ, विक्रम वाघ, बादशहा शेख, अमोल गवळी हे आवर्जून उपस्थित होते.पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काॅ.कानडे ,व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. गुलालाची उधळण करीत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत व डीजे च्या तालावर युवा वर्ग थिरकला.