Home Breaking News जवखेडे खालसा ग्रामपंचायत निवडणूकीत उद्धवराव वाघ यांच्या शेतकरी मंडळाचे पाच तर सत्ताधारी...

जवखेडे खालसा ग्रामपंचायत निवडणूकीत उद्धवराव वाघ यांच्या शेतकरी मंडळाचे पाच तर सत्ताधारी स्वाभिमानी मंडळाचे सात उमेदवार विजयी, चैतन्यचा दणदणीत पराभव

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या जवखेडे खालसा ग्रामपंचायत निवडणूकीत व्रुद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी ग्रामविकास मंडळाच्या सरपंचा सह पाच जागा निवडून आल्या आहेत. तर सत्ताधारी स्वाभिमानी मंडळाच्या सात जागा निवडून आल्या आहेत. तर तिसऱ्या चैतन्य कानिफनाथ मंडळास एकही जागा न मिळाल्याने त्यांचा दणदणीत पराभव झाला आहे. शेतकरी मंडळाचे लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार चारुदत्त उद्धवराव वाघ यांना(१०६२मते) मिळवून विजयी झाले आहेत.शेतकरी मंडळाचे सदस्य पदाचे विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.१) वार्ड क्र.दोन मधून वाघ सुनिता राजेंद्र(२४७मते),वार्ड क्र.तिन मधून गवळी वर्षा अमोल(४०४मते),वार्ड क्र.चार मधून मतकर गोविंद घनश्याम(३४८मते) आणि विद्या वैभव आंधळे(४०४मते), तर सत्ताधारी स्वाभिमानी मंडळाचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे वार्ड क्र.एक मधून कासार गणेश सिताराम(२९१मते), कासार शुभांगी संतोष(२६५मते),वार्ड क्र.दोन मधून वाघ अमोल अच्युतराव(२३८मते) आणि आंधळे शांताबाई प्रल्हाद(२३२मते),वार्ड क्र.तिन मधून पठाण इरफान साहेबखाँ(३१२मते) आणि जाधव कौसाबाई केरु(३४९मते), वार्ड क्र.चार मधून वाघमारे स्वप्नील पंढरीनाथ(३५४मते)या प्रमाणे दोन्ही मंडळाचे उमेदवार विजयी झाले आहेत. आता पराभूत झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे- शेतकरी मंडळाचे कासार लक्ष्मण(१९४मते), कासार स्वाती(२२०मते), आव्हाड पाराजी(२००मते),शेख सलिमाबी(१९८ मते),शेख शहाबुद्दीन(२५६मते), जाधव मिराबाई(३३२मते), वाघमारे बाबासाहेब(३३५मते), स्वाभिमानी मंडळाचे पराभूत उमेदवार सरपंच पदासाठी आंधळे विशाल विक्रम(९३२मते),शेख रुबाबी(१९७मते),सरगड,भारती(२६८मते),मतकर संतोष अशोक(२६४मते),वाघ कविता(२८३मते),चैतन्य मंडळाचे पराभूत उमेदवार पुढील प्रमाणे-सरपंच पदासाठी घाटुळ विष्णु(३४७मते),वाघ निलेश(७२मते),वाघ तनुजा(१४४मते),वाघ सोमनाथ(१२५मते), सरगड पवन(७७मते), आणि सरपंच पदासाठी अपक्ष असलेले उमेदवार अमोल जाधव(२३मते),शिवाजी वाघ(१४मते)या प्रमाणे मतदान होउन सुज्ञ मतदारांनी राजकीय मिसळ करून पुढारपण करणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात झंनझनीत अंजन घातले आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैभव थोरे,आणि सहाय्यक निर्णय अधिकारी म्हणून पवन सानप यांनी काम पाहिले आहे.या निवडणुकीत हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या समाजात जातियवादी तेढ निर्माण करून राजकारण करणाऱ्यांना मतदारांनी चांगलीच सनसनाटी चपराक दिली आहे.गेल्या सत्तर वर्षा पासून आज पर्यंत हिंदु आणि मुस्लिम समाज हा वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने या गावात नांदत आहे.सतत जातीय सलोखा पहावयास मिळत आहे.पण गेल्या मार्च महिन्यापासून गावात जातियवाद्यांनी समाजात दुफळी निर्माण केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.”घरात नाही दाणा, आणि मला बाजीराव म्हणा”या बांडगुळी प्रव्रुतीला सामांन्य मतदारांनी खड्यासारखे बाजूला सारले आहे . ही प्रवृत्ती वेळीच वेसन घालून आवरली पाहिजे तरच गावात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिसगाव बीटच्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदारांनी संमिश्र कौल दिल्याने गावात “कही खुशी कही गम” असे चित्र पहावयास मिळाले आहे. वार्ड क्र.तिन मधिल स्वाभिमानीचे उमेदवार इरफान पठाण यांच्या कडून शेतकरी मंडळाचे दिग्गज उमेदवार शहाबुद्दीन बाबुलाल शेख यांचा झालेला पराभव शेतकरी मंडळाच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.” गाव तस चांगल पण वेशिला टांगल”अस म्हणण्याची वेळ आली आहे.कारण निवडणूकी पुर्वी खरी बातमी लिहली म्हणून गावातील काही बांडगूळांना ती चांगलीच झोंबली आहे.या बातमी प्रमाणेच मतदारांनी कौल दिलेला आहे.या विषयी पोलिसांनी वेळीच दखल घेतली आहे.उठ सुट कोणीही येतो आणि नेता होउ पाहतो त्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. आम्हाला मतदारांनी दिलेला कौल मांन्य असुन चार सदस्य आणि सरपंच पदाच्या जोरावर आम्ही गावाचा विकास करताना भ्रष्टाचार मुक्त आणि स्वच्छ कारभार करून गावाला दाखवून देउ अशी ग्वाही शेतकरी मंडळाचे जेष्ठ नेते उद्ववराव वाघ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here