आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुम ताई कांदे यांनी केला किन्नरांचा सन्मान

0

नांदगांव : नांदगाव येथील आमदार निवासस्थानी नांदगाव मनमाड शहरातील तृतीयपंथीयांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला .दीपावली निमित्त सर्व तृतीयपंथीयांना आमंत्रित केले होते. या वेळी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर श्री श्री पायलगिरी गुरू, महामंडलेश्वर नंदगिरी, मुस्कान गुरू, नीतू हाजी गुरू, अग्णेश गुरू, श्रावणी पायल नंदगिरी या मंचावर उपस्थित होत्या.आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुम ताई कांदे यांनी महामंडलेश्वर गुरूंचे मंत्रोच्चाराच्या गजरात पाद्य पूजन केले. या वेळी साडी चोळी, गुलाब पुष्प हार घालत सर्व गुरूंचा सन्मान केला .ढोल ताशांच्या गजरात सर्व तृतीयपंथीयांचे स्वागत सौ.अंजुम ताई कांदे व शिवसेना महिला आघाडीने केले. या वेळी गुलाब पुष्पंचा वर्षाव सुरू होता.या ठिकाणी सर्व तृतीयपंथीयांच्या हातावर मेहंदी काढली गेली. सर्वांच्या हातात हिरव्या बांगड्या घातल्या गेल्या. सर्वाँना फेटे बांधले गेले.दीपावली निमित्त सर्वाँना साडी, मिठाई, दीपावली गिफ्ट बॉक्स तसेच ओवाळणी देऊन भेट देण्यात आली.या नंतर सर्वाँना पंच पक्वान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.सर्व स्तरातील घटकांसोबत दीपावली साजरी केली जाते पण तृतीय पंथीयांना नेहमीच दुर्लक्षित केले जाते म्हणूनच आपणही समाजाचा एक घटक आहेत या भावनेतून आपल्या सोबत हा क्षण साजरा करावा, आपल्या दीपावलीच्या आनंदात सामील व्हावे या प्रामाणिक भावनेतून हा कार्यक्रम घेत असल्याचे सौ. अंजुम ताई कांदे यांनी सांगितले.महामंडलेश्वर श्री पायलगुरु यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना अण्णा व ताई यांनी आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर असा राबवला आम्हाला मानपान दिले आमचे पूजन केले, आमच्यावर फुलांचा वर्षाव करून आम्हाला दीपावलीची भेट दिली या सर्व पाहून आम्हा सर्व किन्नरांना खूप- खूप आनंद होत आहे ,आणि हा मानपान दिल्याबद्दल आभार मानले तसेच अण्णा व ताई यांना उदंड आयुष्य व भरभराटी व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो ,असे भगवती चरणी प्रार्थना करत आशीर्वाद दिला.या प्रसंगी महाराष्ट्राचे किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर श्री पायल गुरू, मुस्कान गुरू, महामंडलेश्वर नंदगिरी, नीतू हाजी गुरू, अग्नेश गुरू, श्रावणी पायल नंदगिरी (निक्की) सलमा मुस्कान शेख तसेच मोठ्या संख्येने किन्नर उपस्थित होते.
या वेळी शिवसेना , महीलाअघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here