नांदगाव मतदारसंघ राज्यातून दुष्काळ ग्रस्त जाहीर करून देण्याबाबत आमदार सुहास आण्णा कांदे आग्रही : मुख्यमंत्री यांची सकारात्मक भूमिका

0

नांदगांव : आमदार सुहास आण्णा कांदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेत नांदगाव मतदारसंघाचा दुष्काळ यादीत समावेश नसल्याबाबत चर्चा केली, तसे रीतसर पत्रही दिले असून यावर राज्यातून नांदगाव मतदारसंघ दुष्काळ जाहीर करू असे मुख्यमंत्री महोदय यांनी आश्वासन दिले आहे. तसेच मदत, पुनर्वसन विभागास तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.नांदगाव मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर होण्यासाठी सर्व निकषात बसत असतानाही दुष्काळ जाहीर झालेल्या यादीत समावेश न झाल्याने आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मुख्यमंत्री महोदय यांच्या कडे पाठपुरावा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here