Home Breaking News सपासप नंग्या तलवारीचे वार अंगावर घेत त्यांनी दिले राज्य बदलाचे संकेत?मीरीच्या बिरोबा...

सपासप नंग्या तलवारीचे वार अंगावर घेत त्यांनी दिले राज्य बदलाचे संकेत?मीरीच्या बिरोबा होईकातील भविष्य वाणीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ!

0

अहमदनगर :  (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरी येथील बिरोबा मंदिरातील भविष्य वाणीने संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे.मीरी येथील बिरोबा भक्त सिताराम बाळाजी भगत यांनी भंडाऱ्याची उधळण करीत आणि डफाच्या तालावर न्रुत्य करीत सपासप ऊघड्या अंगावर तलवारीचे वार घेत आगामी वर्षाच्या भविष्यवाणीत राज्य बदलाचे संकेत दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली आहे. भगत यांनी पाच शब्दात होईकात सांगितलेली भविष्य वाणी पुढील प्रमाणे १)दिवाळीचा दिवा साजरा होईल, गोंदण भरन,पिडारे वाहीन, कईक हसतेन कईक हंबरडा फोडतील – म्हणजे दिवाळीला काही ठिकाणी पाउस पडेल,काही ठिकाणी पडणार नाही.२)सटीचे सटवान चळण फिरेल, बांदाशेजारी बांद दैवाचा राजा दैवान खाईल -म्हणजे चंपाषष्ठीला आकाशात ढग जमा होतील पण अतिशय मोजक्या ठिकाणी पाउस होईल. ३)दुगधर येतील झोकारे खातील, गहु हरबरे जोडीने फिकतेन – गहू हरबरे पिकतील पण कमी प्रमाणात विकतील. ४)धरणी हादरल,रक्ताचा पूर वाहीन,राज्य बदलन,मायेच लेकरू पारख होईल – म्हणजे काही ठिकाणी भुकंप होईल,जिवीत हाणी होउन रक्ताचा पूर वाहील,आई आणि मुलाची ताटातूट होईल आणि सरकार राज्य बदलाचे स्पष्ट शब्दात संकेत दिले आहेत.५)जठुड साधन,आखाडी पडन,पंधरा ते तिनवाराची,नंतर महापूर वाहीन,गाई हिऱ्याला लागतील,गादीची छाया होईल- जठुड साधन म्हणजे पुढील वर्षीचे जूनमध्ये पेरणी होउन पहिले पीक चांगले येईल परंतु आषाढ महिन्यात पंधरा ते एकवीस दिवस पाउस पडणार नाही, नंतर मात्र भरपूर प्रमाणात पाउस पडून पुरग्रस्त परिस्थिती निर्माण होईल आणि जनावरांना भरपूर प्रमाणात चारा उपलब्ध होईल याप्रमाणे होईकातील पाच शब्दात भविष्य वाणी कथन करण्यात आली.ईतर बिरोबा भक्त आसाराम भगत,रखमाजी भगत,भाउसाहेब तोगे, आबू भगत,गोरक्षनाथ तोगे, बंडू तोगे,लक्ष्मण सोलाट, भानुदास भगत,अशोक सोलाट, जबाजी निर्मळ, दिनेश सोलाट यांनी त्यांना सहकार्य केले. गावातील बिरोबा यात्रा कमेटीच्या वतीने सकाळी हजेरी कार्यक्रम आणि दुपारी पैलवान शिपनकर यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील नामांकित मल्लांचा कुस्त्यांचा भव्य जंगी हंगामा भरविण्यात आला होता.पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ.भिंगारदीवे, आणि पो.काँ.पोपट आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.मंदिरावर आकर्षक रोशनाई करण्यात आली होती.यात्रेतील खेळण्यांच्या दुकानाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने तोबा गर्दी झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेची जाम कोंडी झाली होती. यावर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here