Home Breaking News मीरी विविध कार्यकारी. सेवा सहकारी सोसायटीच्या चेरमनपदी आसाराम वीर (भगत), तर व्हाईस...

मीरी विविध कार्यकारी. सेवा सहकारी सोसायटीच्या चेरमनपदी आसाराम वीर (भगत), तर व्हाईस चेरमनपदी जगन्नाथ वेताळ यांची बिनविरोध निवड

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) संपूर्ण पाथर्डी तालुक्यातील सहकारात अग्रगण्य म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मीरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेरमन पदी विरभद्र देवस्थानचे भक्त आणि धनगर समाजाचे नेते आसाराम वीर (भगत) यांची तर व्हाईस चेरमन पदी जगन्नाथ वेताळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाथर्डी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. राहुरीचे आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांचे खंदे समर्थक व माजी पंचायत समिती सदस्य युवा नेते राहुल गवळी यांच्या नेतृत्वाखालील पँनल मधून नवीन संचालक मंडळाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. गेल्या दहा वर्षापासून या संस्थेवर राहुल गवळी यांचेच वर्चस्व आहे. धनगर समाजाला न्याय देण्यासाठी आसाराम वीर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे .ही निवड एक वर्षासाठी असल्याचे गवळी पाटील यांनी सांगितले. या निवडीच्या वेळी पाथर्डी येथील कार्यालयात मावळते अध्यक्ष शिवाजीराव गवळी, माजी उपाध्यक्ष सौ.छायाताई तोगे,विष्णू सोलाट, अशोक गवळी, रघुनाथ वाघ,हे आवर्जून उपस्थित होते. नुतन चेरमन आसाराम वीर आणि व्हा. चेरमन जगन्नाथ वेताळ यांचे आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी अभिनंदन केले आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कंठाळे साहेब यांनी काम पाहिले. मीरी सोसायटीचे सचिव मुळे भाउसाहेब यांनी त्यांना विषेश सहकार्य केले.संपूर्ण मीरी पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी वीर आणि वेताळ यांच्या नुतन निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.गावात गटातटाचे राजकारण न करता स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही नुतन चेरमन व्हा.चेरमन यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here