नाशिक : दिनांक 31 ऑगस्ट रोजी मनोधार सामाजिक संस्थेच्या वतीने अंबड लिंक रोड वरील सिद्धिविनायक अपंग पुनर्वसन संस्था नाशिक संचालित बौद्धिक अक्षम बहू विकलांग मुला मुलींच्या शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. संस्थेचे उपाध्यक्ष प्रो राजेश गोसावी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. संस्थेच्या सचिव एडवोकेट पुनम तांबट, क्रिएटिव्ह माईंड स्कूलच्या प्रिन्सिपल मनोधारच्या सदस्य श्रीमती मनीषा जोंधळे यांनी मुलांना औक्षण करून राख्या बांधल्या. तसेच खावू वाटप केले. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना एडवोकेट पुनम तांबट यांनी अशा मुलांचे पुनर्वसन होण्याकरिता कुटुंब आणि समाजाची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. अशा मुलांना छोटे-मोठे व्यवसायिक अभ्यासक्रम देऊन स्वावलंबी बनविले पाहिजे. उपजीविकेच्या संधी निर्माण करून दिल्या पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. मनोधार सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष नाशिकच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गीताताई गायकवाड यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. अत्यंत भावनिक आणि उत्साही वातावरनात झालेल्या या कार्यक्रमाने गतिमंद मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे, आनंदाचे भाव दिसुन आले.

Home Breaking News सिद्धिविनायक अपंग पुनर्वसन संस्था नाशिक संचालित बौद्धिक अक्षम बहू विकलांग मुला मुलींच्या...








