मनपा शाळा क्र ७१, रायगड चौक शाळेत पर्यावरण पूरक रक्षाबंधन

0

नाशिक : हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र ७१, रायगड चौक, सिडको शाळेत रक्षाबंधन निमित्त “पर्यावरण पूरक राखी बनवणे” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून पर्यावरण पूरक राख्या वर्गशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केल्या. बंधुत्वाचे नाते वृध्दिंगत होण्यासाठी शाळेतील विद्यार्थीनींनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे औंक्षण करुन राख्या बांधल्या. पर्यावरणात वृक्षांचे महत्त्व लक्षात घेता शालेय परिसरातील वृक्षांना भाऊ मानून राख्या बांधण्यात आल्या. रक्षाबंधनाचे औचित्य साधून वृक्षसंवर्धन करण्याचे संस्कार यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या बालमनावर करण्यात आले.
उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली किसन काळे, विनोद मेणे, प्रमिला देवरे, शोभा मगर, कविता वडघुले, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, संध्या जाधव, वर्षा सुंठवाल, किर्तीमाला भोळे, प्रविण गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here