डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन मिशन योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विविध विकास कामे नांदगाव मध्ये:- डॉ. भारती पवार

0

नांदगांव  :नांदगाव तालुक्यातील भालूर येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून ७ कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण, तसेच ३ कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामाचे भूमिपूजन करण्यात आले.या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार दिल्लीहून ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या. डॉ. पवार यांनी शहरात मिळणाऱ्या सुविधा ग्रामीण भागातील नागरिकांनी मिळाव्या, या हेतूने विविध योजनेतून हे काम उपलब्ध करून दिले आहे तसेच मतदारसंघासाठी सदैव विकासाचे धोरण घेऊन काम करत आहे, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी सरपंच अर्चना निकम, उपसरपंच सिंधूबाई निकम, नागापूरचे सरपंच राजाभाऊ पवार, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे शिवसेना नेते अल्ताफ खान, जिल्हाप्रमुख किरण देवरे, जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष प्रमोद भाबड, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, दत्तराज छाजेड, राजाभाऊ जगताप, बबलू पाटील, किशोर लहाने, बाळासाहेब आव्हाड, अंकुश कातकडे, संजय आहेर बापूसाहेब जाधव, सागर आहेर, अशोर निकम, सोमनाथ घुगे, पप्पू कुमगर, अशो आयनोर, राजू सांगळे, कैलास घोरपडे प्रकाश काकड, राजेश निकम, शालूब थेटे, दिगंबर निकम, विक्रम निकम, देवीदा निकम, मनीषा मंगळ, राजेश निकम, गणप निकम, नंदू इल्हे, भागवत पवार, आरस सोनवणे, वसंत निकम, शिवाजी ढोरे विठ्ठल सोमासे, तुकाराम निकम, लहा निकम, नामदेव पाटील, अरुणा पवार, द बोराडे, दादासाहेब धनगे, रामदास निकर ग्रामसेवक वाय. एस. निकम व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here