केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नवी दिल्ली येथे नॅशनल मेडिकल लायब्ररी (NML) च्या ४ थ्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

0

राज्य : मा.केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया जी यांच्या मार्गदर्शनाखाली NML ने व्यावसायिकांना वैद्यकीय संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत.NML चे महत्त्व आणि प्रभाव सांगताना डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सांगितले की, “ आता दुर्गम भागात राहणारे प्राध्यापक, संशोधन करणारे विद्यार्थीही NML च्या ई-रिसोर्सेसचा लाभ घेत आहेत, एनआयसीच्या क्लाउड सॉफ्टवेअरवर अपलोड केलेल्या पुस्तकांचा आणि जर्नल्सचा मेटाडेटा eGranthalaya आणि माहिती शोधकांना सहज शोधता येते. NML ची ई-संसाधने जसे की ई-पुस्तके, ई-जर्नल्स, क्लिनिकल केसेस, उच्च रिझोल्यूशन प्रतिमा इत्यादी सदस्य संस्थांसह इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेस इन मेडिकल (ERMED) कन्सोर्टियमद्वारे उपलब्ध आहेत.” ज्ञानाचा पाठपुरावा करणे केवळ रुग्णांच्या काळजीसाठीच नव्हे तर वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी देखील फायदेशीर आहे, असेही त्या म्हणाल्या.डॉ.भारती प्रवीण पवार यांनी यावर भर दिला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, सरकारने गेल्या 9 वर्षांत देशातील विविध वैद्यकीय संस्था/महाविद्यालयांमध्ये जागांची संख्या वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, ज्याचा परिणाम म्हणून पदवीपूर्व जागांची संख्या जी 2014 पूर्वी 51,348 होती ती आजपर्यंत 1,07,948 पेक्षा जास्त झाली आहे, म्हणजे 110% वाढली आहे. त्याचप्रमाणे, 2014 पासून, देशातील पीजी जागांची संख्या 117 टक्क्यांनी वाढून 67,802 जागांवर पोहोचली आहे. याचा अर्थ असा की, येणाऱ्या काळात, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे वैद्यकीय शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी NML ची भूमिका महत्त्वाची आहे , असे त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here