Home Breaking News शेवगाव येथे जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने बांधकाम कामगारांचा मेळावा संपन्न !

शेवगाव येथे जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने बांधकाम कामगारांचा मेळावा संपन्न !

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) नोंदणीक्रुत बांधकाम कामगारांच्या प्रलंबीत मागण्या साठी जनशक्ती श्रमिक संघाच्या वतीने शेवगाव येथील आबासाहेब काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात बांधकाम कामगारांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी अँडहोकेट शिवाजीराव काकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून युवकांचे नेते जगन्नाथ गावडे हे होते. यावेळी शेवगावचे निवासी नायब तहसीलदार रवींद्र सानप यांना बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी मेळाव्यात अनेक बांधकाम कामगारांना सन्मानित करण्यात आले.तसेच आंबेडकर चौकात जनशक्ती श्रमिक संघाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटनही महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले.शासनाच्या बांधकाम कामगारांच्या कुटुंबासाठी असणाऱ्या योजनांची माहिती अँड. शिवाजीराव काकडे यांनी या मेळाव्यात दिली. तर जेष्ठ नेते जगन्नाथराव गावडे यांनी अनेक प्रलंबित प्रकरणात लक्ष घालून अनेक लाभार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. या प्रसंगी जनशक्ती श्रमिक संघाचे अध्यक्ष संजय दुधाडे,सचिव अकबर शेख, अशोक बर्डे,वसंत वाघ,विष्णू दिवटे, शिवाणी लांडे, भाउसाहेब राजळे, माणिक गर्जे, माउली धनवडे,सुखदेव जाधव,आबासाहेब काकडे, सुनिल दारकुंडे यांच्यासह शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील अनेक प्रमुख गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी अनेक नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. राजूमामा फलके यांनी सुत्रसंचालन केले. तर आभार निकम सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here