मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘१२’ महत्त्वाचे निर्णय

0

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामधील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय घेत राज्यातील आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १२ निर्णय़ घेण्यात आले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल निर्णय –
1. महाराष्ट्र राज्य व्यवसाय,व्यापार,आजिविका व नोक-या यावरील कर अधिनियम, १९७५ यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यावरील कर(सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी.

2. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करून महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (व्दितीय सुधारणा) अध्यादेश, २०२० प्रख्यापित करण्यास मंजुरी.
3. रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग योजना सुरू करण्यास मान्यता. फलोत्पादन शेतकऱ्यांना होणार लाभ.
4. हंगाम २०१९-२० मध्ये हमी भावाने खरेदी केलेल्या कापसाचे शेतक-यांचे चुकारा अदा करण्यासाठी बँकांकडून नजरगहाण कर्ज घेण्यास कापूस पणन महासंघाला शासन हमी देण्यास मान्यता.
5. माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण – २०१५ ला नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत देण्यात आली मुदतवाढ.
6. कोविड-१९ च्या पश्चात उद्योग वाढीसाठी राज्य शासनाची गतिमान पाऊले. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजनांची आखणी.

7. राज्याचे बीच शॅक धोरण तयार करण्यास मंजुरी.समुद्रकिनारी पर्यटकांना विविध सुविधा उपलब्ध होणार.
8. नागपूर-नागभिड या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रुपांतर करण्याकरिता राज्य शासनाचा सहभाग देण्यास मान्यता.
9. आशा स्वयंसेविकांच्या आणि गट प्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ.राज्यातील आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा.
10. एमटीडीसी जमिनीचा खासगीकरणातून विकास करणार
11. गव्हासाठी विकेंद्रीत खरेदी योजना
12. कोस्टल गुजरात बरोबर वीज खरेदी करार मान्यता

याशिवाय २८ जूनपासून सलून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. महत्त्वाचं म्हणजे सलून चालकांना फक्त केस कापण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. थोडे दिवस निरीक्षण केल्यानंतर यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

लॉकडाऊनमुळे बंद असलेला सलून व्यवसाय अखेर महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार आहे. राज्य सरकारने येत्या रविवारपासून म्हणजे २८ जूनपासून सलून आणि जिम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. जिम आणि सलून या आठवड्यात सुरु होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here