कलियुगातील अद्भुत द्रुश्य,रखरखत्या लालबुंद विस्तवावरुन चालत जाण्याची रहाडयात्रा हनुमान टाकळी येथे संपन्न

0

अहमदनगर :  (सुनिल नजन/अहमदनगर) आजच्या विज्ञान युगात विस्तवावर चालत जाणे ही संकल्पना मानवी मनाला अजिबात पटत नाही परंतु अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथिल हनुमान मंदिरा समोर रखरखत्या लालबुंद विस्तवावर चालत जाउन नवसपुर्ती करण्याची रुढी परंपरा आजही अविरतपणे सुरू आहे.समर्थ रामदास स्वामी यांनी या मारुती ची स्थापना केलेली आहे. दरवर्षी आषाढ वद्य चतुर्दशीला ही यात्रा भरते. समर्थ हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश अप्पा महाराज, पाथर्डी मार्केट कमिटीचे सभापती असल़ेले आणि देवस्थानचे सचिव सुभाषराव बर्डे,नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,मुंबई उच्च न्यायालयाचे निव्रुत्त न्यायाधीश कमलाकर अनासपुरे यांच्या हस्ते सपत्निक महापुजा करून विस्तवावरुन प्रथम चालण्याचा मान बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील बाबासाहेब लोखंडे यांना मिळाला. मुंबईचे पोलीस अधिकारी सुभाषराव दगडखैर, आणि बबनराव दगडखैर यांच्या वतीने यात्रेनिमित्त आलेल्या भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरावर स्क्रीन सह आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर साहेब,पोलीस नाईक अनिल बडे,पोलीस नाईक किशोर लाड,पोलीस शिपाई एकनाथ बुधवंत,पोलीस शिपाई किशोर पालवे, होमगार्ड विष्णू गोसावी, भागवत केदार, भाउसाहेब पालवे, कल्याण नागरगोजे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. (प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here