श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर नांदगाव येथील विशाल सभामंडपाचे लोकार्पण संपन्न

0

नांदगांव : श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर नांदगाव येथील विशाल सभा मंडपाचे लोकार्पण आज आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले.आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून 60 लक्ष रुपये निधीतून सदर सभा मंडप उभारण्यात आला आहे.येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणाऱ्या बाल वारकऱ्यांनी टाळ मृदंग व अभंगाच्या उच्चारत आमदार सुहास अण्णा कांदे यांचे स्वागत केले.याप्रसंगी मंचावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे नगरपालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे साहेब श्री विष्णू निकम सर प्रमोद भाबड अमोल नावंदर दीपक मोरे सावता उत्सव समितीचे राजाभाऊ मोरे प्रशांत खैरनार सतीश गायकवाड बाळासाहेब मोकळ आदि उपस्थित होते.सावता महाराज उत्सव समितीतर्फे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करण्यात आला.
राम कथाकार रामप्रियादीदी यांचा सत्कार आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केला
याप्रसंगी बोलताना श्री विष्णू निकम सर यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले तसेच आजपर्यंत अण्णांनी समाजासाठी खूप काही दिले आहे आणि अजूनही देण्याची तयारी दाखवत आहे याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत असे मत व्यक्त केले.ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी आपल्या भाषणात आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघात प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना न्याय देत मोठे विकास कार्य होत असल्याचे सांगितले.आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या भाषणात मतदारसंघात करीत असलेला विकास हे माझे कर्तव्य असल्याचे मी समजतो कारण आपण मला मत दिले आहे आणि या मताला जागणे माझे कर्तव्य आहे असे सांगितले, सावता कंपाउंड येथे आज पर्यंत अनेक वेळा आलो असताना सप्ताह काळात पावसामुळे होणारी हाल मी पाहिली आणि म्हणूनच साठ लाख रुपयांचा सभा मंडप तात्काळ मंजूर करून दिला यापुढेही पन्नास लाख रुपये देतो या संपूर्ण परिसराचा विकास करून घ्यावा जेणेकरून समाजातील गरजवंत कुटुंबांना या वास्तूचा लाभ होईल, या ठिकाणी मोठे सप्ताह संपन्न होतील असे सांगितले.
पाच महिन्यातच हा विशाल सभा मंडप बांधून तय्यार झाल्यामुळे उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला,याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यांना उद्देशून आमदार यांनी येत्या वर्षभरात नांदगावकरांच्या प्रत्येक घराघरात 24 तास नळाला पाणी येईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी सावता उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते तसेच नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here