Home Breaking News तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि...

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि पप्पूदादा केदार यांचा भारत राष्ट्र समीती पक्षात प्रवेश

0

अहमदनगर :  (सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शेवगाव तालुक्यातील जयभगवान महासंघाचे तालुका अध्यक्ष व बाळासाहेब सानप आणि संदिप राजळे यांचे खंदे समर्थक पप्पूदादा केदार यांनी हैदराबाद येथे जाउन (brs)भारत राष्ट्र समीती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी वाडगाचे उपसरपंच महादेव जवरे,शरद शिरसाठ, संजय केदार, गणेश जायभाये उपस्थित होते. भारत राष्ट्र समिती (brs) या पक्षात अतिशय वेगाने नवनवीन कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेशासाठी विचारणा केली आहे. कारण भारत राष्ट्र समिती हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडनुका स्वबळावर लढविणार आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते या पक्षाकडे आकर्षित होत सामिल होताना दिसत आहेत.२२२ शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील ज्या कार्यकर्त्यांना (बि.आर.एस.)या पक्षात प्रवेश करावयाचा असेल त्यांनी मुख्य समन्वयक संदिप राजळे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन भारत राष्ट्र समीती पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत (बी.आर.एस.) पक्षात प्रवेश केला असुन महाराष्ट्रातील मोहोळ आणि देगलूर मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात संदिप राजळे यांनी प्रत्येक गावात घौडदौड सुरू केली असुन सर्व सामांन्य मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावात प्रस्थापित पक्षांच्या पुढारपणाला कंटाळलेले कार्यकर्ते भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये सामिल होताना दिसत आहेत.महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षांनी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्र शेखर राव यांच्या (बी.आर.एस.) पक्षाचा धसका घेतला आहे.कारण महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात हा पक्ष काहींना मारक तर काहींना तारक ठरू पहात आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याच पक्षाची चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here