
नाशिक : व्यसनमुक्ती करीता कुटुंब जागृती आवश्यक- स्यवियो डिक्रुज मोक्ष फाउंडेशन व्यसनमुक्ती पुनर्वसन आणि मानसिक आरोग्य सेवा केंद्र यांच्या वतीने दिनांक 22एप्रिल 2023रोजी केंद्रात दाखल झालेल्या व्यसनी व्यक्तींच्या कुटुंबियांचे कौटुंबिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी स्यावियो डिक्रुज बोलत होते.
कुठल्याही व्यसनमुक्ती व पुनर्वसन कार्यक्रमात कुटूंबीयांची सकारात्मक भूमिका अत्यंत महत्वाची असून व्यसनमुक्ती केंद्रात प्रवेश घेण्यापासून तें कुटुंबात पुनरागमन होई पर्यंत कुटूंबीयांची साथ गरजेची असतेच तर त्याहून अधिक पुढील समायोजनात कुटुंबाने व्यसनी व्यक्तीला समजावून घेऊन त्याच्या पुनर्वसन प्रक्रियेत आवश्यक नियम नियमवाली पाळण महत्वाचं असल्याच सांगितले. यावेळी नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्यां तथा समुपदेशक गीता ताई गायकवाड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली नाशिक मध्ये प्रथमच मोक्ष फाउंडेशन च्या वतीने अश्या प्रकारच्या कार्यकामाचे आयोजन होत असल्याचे त्यांनी सांगितले विशेषतः मोक्ष फाउंडेशन च्या वतीने 2015 पासुन देण्यात येणाऱ्या कार्यकमाची माहिती त्यांनी दिली वर्क थेरपी आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून सूत्र बद्ध कार्यक्रम हेच मोक्ष फाउंडेशन चे वैशिष्ट्य असल्याचे त्या म्हणाल्या. जेष्ठ समुपदेशक वैभव पाटील. आर. रेने, सुनील जोशी डॉ. राउंत यांनी आपले अनुभव कथन केले मानस विकास तज्ञ हर्षिता जोशी यांनी कुटुंबियांच्या प्रश्नाचे शंका समाधान केले. कार्यक्रम यशस्वीतें करिता राजेश सराफ पराग पाटील जय तिवारी गौरव कमानी जे. पी. पाटील करुणा आहिरे जॉर्ज मकॅडो, निलेश पावसकर, सुनील पाटील,अनिल यादव, काळू मोरे, युवराज घोडके आदींनी परिश्रम घेतले तर मानसोपचार तज्ञ डॉ. महेश भिरूड डॉ. श्रियान शहा यांनी कार्यकमास शुभेच्छा दिल्या.
