श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह निमित्त आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी श्री दत्त मंदिर रोड, मनमाड येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र येथे उपस्थिती

0

  मनमाड : स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह निमित्त आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी श्री दत्त मंदिर रोड, मनमाड येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र येथे उपस्थिती लावली. या वेळी मनोभावे स्वामींचे दर्शन घेतले. या प्रसंगी सेवेकरी बांधवांनी आण्णांचे स्वागत केले.या प्रसंगी बोलतांना करंजवण पाणी योजना चे काम वेगाने सुरू असून या मागे श्री स्वामी समर्थांचा च आशीर्वाद असल्याचे सांगितले. केंद्रासाठी 40 लाखांचा सभामंडप या आधीच मंजूर होता पण तो लहान होईल अशी माहिती मिळाली म्हणून आता हाच सभामंडपासाठी आता 65 लाखांचा निधी मंजूर करत असल्याचे सांगितले. लवकरच काम सुरू होईल असेही स्पष्ट केले.या प्रसंगी शिवसेना जिल्हाउपप्रमुख सुनील हांडगे तालुका समन्वयक महावीर ललवाणी, शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहरप्रमुख आसिफ शेख, अल्ताफ खान, बबलू पाटील, वाल्मीक आप्पा आंधळे, लोकेेश साबळे अजिंक्य साळी, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते. 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here