गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद जी सावंत आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज गोव्यात आयोजित डिजिटल हेल्थ समिट 2023 मध्ये भाग घेतला. मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल माध्यमांचा वापर करून प्रत्येक उद्योग आणि आरोग्य सेवा क्षेत्रात प्रवेश आणि परिवर्तन करण्यास सुरुवात केली आहे. ह्या डिजिटल क्षेत्रात नवकल्पना व बदलणाऱ्या घडामोडींना बळ देत आहेत आणि नागरिकांना घरपोच सेवा पुरवून वितरण अधिक प्रभावी करत आहेत असेही डॉ. भारती पवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.