
गुवाहाटी : मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी आज गुवाहाटी AIIMS, नॉर्थ ईस्ट भारतातील पहिले AIIMS आणि आसाममध्ये तीन नवीन वैद्यकीय महाविद्यालये समर्पित केली. यावेळी आसामचे मा. राज्यपाल श्री गुलाब कटारिया जी, आसामचे मा. मुख्यमंत्री श्री हेमंत बिस्वा शर्मा जी, मा.केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया जी,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार जी आणि आसामचे मा.आरोग्य मंत्री श्री केशब महंता जी या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मा. पंतप्रधानांनी लोकांना आयुष्मान भारत कार्डचेही वाटप केले यामुळे या भागातील रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा मिळतील.
