देशांतर्गत विमान सेवा / रेड झोनमधील विमानतळे उघडणे मुर्खपणाचे ठरेल- गृहमंत्री अनिल देशमुख

0

नवी दिल्ली. लॉकडाउन फेज-4 दरम्यान सोमवारपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू होणार आहे. परंतू, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालने यावर चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की,’ रेड झोनमधल्या विमानतळांना आता उघडणे मुर्खपणाचे ठरेल. प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करणे आणि लाळेचे सँपल घेणे पुरेसे नाही.’ पश्चिम बंगालनेही उड्डाणे सुरू करण्यावर चिंता व्यक्त केली हे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी सांगितले की, आज त्यांनी एविएशन मिनिस्टर हरदीप सिंह पुरी यांच्याशी चर्चा केली. ठाकरे म्हणाले की, ‘मी पुरी यांना म्हणालो की, विमानसेवा सुरू करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवाय.’ यापूर्वी महाराष्ट्र सरकारने शनिवारी केंद्र सरकारसोबत चर्चा केली होती. यात म्हटले की, मुंबई आणि पुण्यासारखे शहर रेड झोनमध्ये आहेत. एअर ट्रॅफिकच्या बाबतीत दोन्ही शहर महत्वाचे आहेत. या दोन शहरात नागरिकांना फिरण्यास पूर्णपणे बंदी आहे. यामुळे सध्या विमानसेवा सुरू केली जाऊ शकत नाही.

ममता बॅनर्जींनी अम्फान वादळाचे कारण दिले

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी म्हणाल्या की, अम्फान वादळानंतर राज्यात मोठे नुकसान झाले आहे. आम्ही हे सर्व ठीक करण्यात व्यस्त आहोत. त्यामुळे आम्ही नागरी उड्ड्यान मंत्रालयाला 30 मे पर्यंत कोलकाता आणि 28 मे पर्यंत बागडोगरा एअरपोर्टवर उड्डाणे स्थगित करण्यास सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here