
अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या कोपरे येथील दक्षिण मुखी मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहातील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता डोंगरवाडी येथील श्रीराम संस्थानचे महंत ह.भ.प.लक्ष्मण महाराज कराड यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. जागराचे किर्तन गेवराई येथील ह.भ.प. प्रतिभाताई महाराज कदम यांचे झाले. गावातून सवाद्य ग्रंथ दिंडी मिरवणूकही काढण्यात आली होती. सर्व ह.भ.प.अभिमंन्यु महाराज भालसिंग,वैष्णवी महाराज वाघमोडे, महेश महाराज आव्हाड, शंकर महाराज भागवत,प्रियंका महाराज रुपनर,ज्ञानेश्वर बटुळे यांची ही किर्तने झाली.शर्मा आणि ढाकणे परिवार यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची समाप्ती झाली. कोपरे,जवखेडे, वडुले, वाघोली, हनुमान टाकळी येथील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा).
