0

तामिळनाडू:  छत्रपती संभाजी नगर आणि तामिळनाडूमध्ये कोयम्बतूर येथील केंद्र सरकारची आरोग्य योजना सीजीएचएस आरोग्य आणि निरामयता केंद्रांचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले.छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रमस्थळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड देखील या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले तर यावेळी खासदार इम्तियाज जलील,खासदार PR नटराजन,आमदार श्रीमती वनाथी श्रीनिवासन उपस्थित होते. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार आपल्या कर्मचार्‍यांसाठी CGHS चे फायदे देशभरात विस्तारत आहे असेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले.तसेच छत्रपती संभाजी नगर हे केवळ महाराष्ट्र राज्यातील पाचवे मोठे शहरच नाही तर वस्त्र आणि कलात्मक रेशीम कापडासाठीही ओळखले जाते.या शहराचे पर्यटनदृष्ट्या तसेच ऐतिहासिक महत्व असून छत्रपती संभाजी नगर आज औपचारिकपणे सीजीएचएस कुटुंबात सहभागी होत असल्याबद्दल डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here