
विजयवाडा :केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या लोकसभा प्रवासादरम्यान विजयवाडा,आंध्र प्रदेश येथे मंडल प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी बूथ स्तरावर बळकट करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर चर्चा करण्यात आली. बूथ रचनेच्या माध्यमातून पक्ष संघटन बळकट करून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे विचार तळागळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे आव्हान डॉ. भारती पवार यांनी यावेळी केले.
