
नांदगाव : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह धनुष्यबाण निर्णय जाहीर करताच नांदगाव येथील आमदार सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालय चांडक प्लाझा या ठिकाणी मोठा जल्लोष करण्यात आला.शिवसेना जिल्हाप्रमुख किरण भाऊ देवरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, व मोठ्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. उपस्थित शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरवत तसेच फटाक्याची आतिषबाजी करत आनंद साजरा केला. 🏹https://youtu.be/VOXl7Xs2AZQ🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
