
दिंडोरी : दिंडोरीत अनेक दुर्गम भागात आणि ग्रामीण भागातही डॉक्टरांनी सेवा देणं आवश्यक आहे, ते जर आपला दृष्टिकोन बदलणार नसतील तर सरकारला याची गांभीर्यानं दखल घेऊन कडक उपाययोजना करावी लागेल असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांनी नाशिक इथल्या दिंडोरी इथे सूचना दिली.तसेच ग्रामीण रुग्णालयातल्या इमारतीचं लोकार्पण आणि चिकित्सा शिबिराचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या,ग्रामीण भागात जायला डॉक्टर तयार व जात नाही, मात्र एक डॉक्टर तयार करण्यासाठी सरकारला किमान दीड कोटी रुपये खर्च करावे लागतात. हा पैसा जनतेच्या कष्टाचा आहे, याची जाणीव ठेऊन, डॉक्टरांनी आदिवासी आणि दुर्गम भागात सेवा देणं हा देशसेवेचाच भाग असल्याचं त्या म्हणाल्या. आरोग्य यंत्रणेची बेपर्वाई खपवून न घेण्याचं केंद्र सरकारचं स्पष्ट धोरण आहे. मनुष्य आजारी पडल्यावर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजारीच पडू नये यासाठी आरोग्य यंत्रणेनं दक्ष रहावं, असंही त्यांनी या वेळी सांगितलं.
