मनमाड शहराचा विकास हाच एक ध्यास : आमदार सुहास अण्णा कांदे

0

मनमाड : दि.09/02/2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाड मुख्य शाखा या कार्यालयात मा. आमदार श्री. सुहास (आण्णा) कांदे साहेब, नांदगाव विधानसभा मतदार संघ, यांचे अध्यक्षतेखाली आणि डॉ. सचिनकुमार पटेल, मुख्याधिकारी तथा प्रशासक मनमाड नगरपरिषद यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड नगरपरिषदमार्फत राबवल्या जाणार्‍या केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना–राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) प्रधान मंत्री आत्मनिर्भर निधि (PM SVANidhi), प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) अशा विविध प्रकारच्या लाभाच्या योजना मनमाड शहरातील गरीब व गरजू सुशिक्षित बेरोजगार लाभार्थ्यांना मनमाड नगरपरिषद आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाड आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मनमाड यांचे सयुक्त विद्यमाने ‘मै भी डिजिटल 4.0’ या प्रशिक्षण मोहिमेअंतर्गत 200 पेक्षा जास्त पथविक्रेते आणि काही स्वयंरोजगार कर्ज वितरित केलेल्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी मा. आमदार श्री. सुहास (आण्णा) कांदे साहेब, डॉ. सचिनकुमार पटेल, मुख्याधिकारी तथा प्रशासक, मनमाड नगरपरिषद, यांचे हस्ते श्री. विकास कुलकर्णी, व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाडचे मार्फत 20 पथविक्रेते यांना प्रत्येकी 10000/- आणि स्वयंरोजगार वैयक्तिक कर्ज घटकाअंतर्गत 8 लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये 2 लक्ष कर्ज व 2 लाभार्थयाना रिक्शा वितरित करण्यात आले तर श्री. अनिरुद्ध भालेराव, व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मनमाडचे मार्फत 08 पथविक्रेते यांना प्रत्येकी 10000/- आणि स्वयंरोजगार वैयक्तिक कर्ज घटकाअंतर्गत 05 लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये 2 लक्ष कर्ज वितरित करण्यात आले आहे.याप्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना श्री संदीप आगोणे, शहर व्यवस्थापक, मनमाड नगरपरिषद यांनी केली, तर शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सौ. अंजुंमताई कांदे यांनी महिलांच्या शास्वत रोजगाराविषयी मार्गदर्शन केले. माजी नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख श्री. मयूर बोरसे यांनी शहारच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी सध्या कार्यान्वित असणारी करंजवन पाणीपुरवठा योजना बाबत माहिती दिली. शिवसेना तालुका प्रमुख श्री. साईनाथ गिडगे यांनी मनमाड शहरात लवकरच MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत उद्योग व्यवसाय सुरू होणार असल्याबाबत मार्गदर्शन केले. तर जिल्हा संसाधव व्यक्ति श्रीमती सीमा वानखेडे यांनी प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) याबाबत माहिती दिली. डॉ. सचिनकुमार पटेल, मुख्याधिकारी तथा प्रशासक, मनमाड नगरपरिषद यांनी नगरपालिका मार्फत राबण्यात येणार्‍या सर्व लाभाच्या योजना आणि शहारच्या सर्वांगीण विकास प्रणालीबाबत माहिती दिली. शेवटी अध्यक्षीय भाषणात मा. आमदार श्री. सुहास (आण्णा) कांदे साहेब, यांनी शहारच्या रोजगाराच्या शास्वत योजना आणण्याची घोषणा केली. मनमाड शहरात भव्य कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारून त्यातून महिलाना प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाचे साधन निर्माण करून देणार असल्याचे आश्वासन दिले. महिला बचत गटांना उत्पादित मालास स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून दिले जाईल असे संगितले. कार्यक्रमाचे आभार सौ. रेखा गांगुर्डे, समूह साधन व्यक्ति, न.प. मनमाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.अशोक पाईक, कार्यालय अधीक्षक, न.प. मनमाड, श्री ज्ञांनेश्वर जाधव, कृषि कर्ज, एसबीआय बँक, योजनेचे समुदाय संघटक श्रीवर्धन कुशारे, अर्चना आव्हाड, शिवसेना उप प्रमुख श्री सुनील भाऊ हांडगे शिवसेना संघटक, श्रीम.विद्या जगताप आणि श्रीम. संगीता बागूल , शिवसेना शहर अधिकारी योगेश इमले व आसिफ शेख, सामाजिक कार्यकर्ते श्री. दिलावर शेख आणि श्री. मीर अहेमद यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here