
नाशिक : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नाशिक नागरी- २,नाशिक येथे नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यालयातील श्री.नाना सावंत,ठोम्बरे भाऊसाहेब, मुख्यसेविका श्रीमती सुदन्या खरे,मयुरी महिरे,पुष्पा वाघ सर्वानी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पूजन केले.मुख्यसेविका श्रीमती शितल गायकवाड,तसेच अंगणवाडी ताईं अन्नपूर्णा अडसुळे ह्यांनी मनोगत व्यक्त केले,प्रकल्प अधिकारी मा.अजय फडोळ ह्यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस ह्याच्या कार्य विषयी सखोल माहिती दिली.
