मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नाशिक: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बाळगलेल्या अपेक्षा पूर्ण होऊ न शकल्याने आपण बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत असल्याचे मत याप्रसंगी भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केले. यासमयी त्यांचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सहर्ष स्वागत करित त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.कोणावर टीका करण्यापेक्षा ज्या पध्दतीने ते यापूर्वी पक्षवाढीसाठी कार्यरत होते तसेच यापुढे देखील कार्यरत राहतील असा विश्वास याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.यासमयी राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here