निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार आवश्यक- डॉ. प्रिया कोल्हे

0

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक २२डिसेंबर २०२२ रोजी डॉ. योगिताताई अपूर्वभाऊ हिरे यांच्या वाढदिवसा निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, महायोग महिला प्रबोधिनी अंतर्गत “आरोग्य व संस्कार” या विषयावर विद्यार्थिनी व माता पालक यांच्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. प्रिया कोल्हे यांनी विद्यार्थिनी व माता यांना मार्गदर्शन करताना, चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा आहे. त्यासाठी फळे, हिरवा भाजीपाला,अंडी, दूध इ.आहार घ्यावा तसेच शरीराच्या आरोग्यासाठी प्रतिकूल असे जंक फूड टाळावे. इत्यादी विचार त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ ज्योती पालवे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून निरोगी शरीर हे व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरक असते. शरीर निरोगी व सुदृढ असेल तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन कुटुंबाचा, समाजाच्या व परिणामी देशाच्या विकास होतो. महाविद्यालयात वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांनीसाठी ” स्रियांना आरक्षण मिळाले संरक्षणाचे काय ? या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.बहुसंख्य विद्यार्थिनिंनी स्पर्धेत सहभाग घेतला.या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. दिपक हिरे, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थिनी व माता बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती राजवाळ एस.डी., कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. एस.डी. हिरे, तर आभार श्रीमती योगिता शिंदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here