
मनमाड : मनमाड शहरातील महर्षी वाल्मीकी क्रिडा संकुल (स्टेडियम) येथे कित्येक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता तसेच येथे खेळांचा सराव करणारे खेळाळू व येथे येणारे नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची काय तरी व्यवस्था व्हावी ही बाब लक्षात घेऊन मनमाड शहर फटाका असोसिएशनच्या पुढाकाराने नगरपालिका कर्मचारी श्री देवेंद्र चुनियान यांना शिवसैनिक जाफर मिर्झा, अशोक मेघाणे, पन्ना बाऊसकर, विजूभाऊ गवळी, दिलीप आहिरे, राजाभाऊ श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते ७०० लिटर पाण्याची टाकी तसेच स्टँडसाठी आर्थिक मदत देण्यात आली,तसेच मनमाड शहर फटाका असोसिएशनचे सभासद श्याम घुगे, भवानी परदेशी, बीट्टू पगार, प्रवीण सानप, लक्ष्मण गोसावी, गोकुळ मेघाणे, बाळूभाऊ सुपेकर, अमर पाटील, आशिष घुगे, लक्ष्मण गवळी, आमिर खान, सुरेश जाधव, मनीष हिंगमीरे, भूषण नेरकर, लक्ष्मण काळे, राहुल सांगळे, श्रीकांत पवार, सोफी शेख, यश श्रीश्रीमाळ, मच्छीन्द्र सोनवणे, निलेश कुलकर्णी आदीं उपस्थित होते ,यावेळी नगरपालिका कर्मचारी श्री देवेंद्र चुनियान यांनी मनमाड शहर फटाका असोसिएशनच्या सर्व सभासदांचे सत्कार करून आभार मानले तसेच फटाका असोसिएशनच्या वतीने शिवसैनिक जाफर मिर्झा यांनी श्री देवेंद्र चुनियान यांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार केले.
