धुळगाव ग्रामपंचायत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

0

येवला : येवला तालुक्यातील धुळगाव ग्रुप ग्रामपंचायत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सरपंच सौ दिपाली बाळासाहेब गायकवाड,उपसरपंच सौ.शांताबाई बारहाते, यांचा हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले,ग्रामविकास अधिकारी एस टी वडितके,राजेंद्र गायकवाड यांनी दीपप्रज्वलन करून सदस्य योगेश गायकवाड,मंगेश आहेर,दत्तू गायकवाड यांनी महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले
यावेळी ग्रामविकास अधिकारी वडीतकें यांनी महात्मा गांधी यांच्या स्वच्छ भारत अभियान विषयी मार्गदर्शन करीत नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळत स्वच्छ भारत अभियान योजनेचाही लाभ घेण्याचे आवाहन केले,सरपंच सौ दिपाली गायकवाड.यांनीही जयंतीनिमित्त सदस्यांसह उपस्थित गावकऱ्यांना शुभेच्छा देत गावात ड्राय डे पाळत व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याचा आग्रह केला
गांधींना लोकांनी महात्मा ही पदवी दिली त्यांनी इंग्रजांना भारत छोडो , चले जाव चा नारा दिला,मिठाचा सत्याग्रह सुरू असताना आंदोलन,मोर्चा काढून २४ दिवस पायी प्रवास करत दांडी यात्रा पूर्ण करून मिठाचा सत्याग्रह यशस्वी केला ,भारत स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान करत प्राण प्रणाले लावल्याचे उदगार यावेळी सरपंच सौ दिपाली गायकवाड यांनी काढले याप्रसंगी सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब गायकवाड यांनी केले तर आभार सदस्य दशरथ माळी यांनी मानले यावेळी माजी चैरमन अप्पासाहेब गायकवाड,राजेंद्र गायकवाड,रामेश्वर गायकवाड,माजी उपसरपंच शशिकांत जगताप,सोमनाथ गायकवाड,पोलिस पाटील दिलीप गायकवाड,जनार्दन सोनवणे,नारायण बारहाते,योगेश, प्रविण झांबरे, रामदास इंगळे, बारहाते, दत्तात्रय, गायकवाड, सुनिल शिंदे, चेतन गायकवाड, बाळा बारहाते, सोमनाथ चौधरी, सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here