
नाशिक : सिडकोच्या हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे विद्याप्रबोधिनी मनपा शाळा क्र. ७१ मध्ये शारदिय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी खास दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करत दांडियाला हजेरी लावली. शाळेच्या प्रशस्त मैदानावर विद्यार्थ्यांचे वर्गनिहाय गोल रिंगण करण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर फेर धरत दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. शिक्षक-शिक्षिकांनीही विद्यार्थ्यांसमवेत दांडियात फेर धरत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.
दांडियाचे आयोजन प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद मेणे, किसन काळे, प्रमिला देवरे, शोभा मगर, कविता वडघुले, रुपाली ठोक, योगिता खैरे, सुनिता धांडे, वर्षा सुंठवाल, किर्तीमाला भोळे, सुवर्णा थोरात, शैलजा भागवत, प्रविण गायकवाड यांनी केले.
